
मुंबई – मुंबईतील आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीच्या पुनर्विकासाचे काम गौतम अदानी यांच्या कंपनीला मिळाले आहे. त्यांची कंपनी धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (DRPPL)ने या प्रकल्पाचे प्लॅनिंग आणि डिझायनिंगसाठी जागतिक लेव्हलच्या कंपन्यांना हायर करणे सुरू केले आहे. कंपनीने अमेरिकेची डिझायनिंग कंपनी Sasaki ब्रिटनची कन्सल्टन्सी फर्म Buro Happold आणि आर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रॅक्टरसोबत करार केला आहे. Sasaki आणि Buro Happold शहर नियोजन व इंजीनिअरिंग क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी आहे. त्याचबरोबर सिंगापूरमध्ये तज्ज्ञ लोकांनाही या प्रकल्पाच्या टीमसोबत जोडले आहे.




