Tushar Doshi Satara Zilla Parishad Election 2026: सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी (Satara Zilla Parishad Election 2026) मोठा राडा झाला होता. पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीमुळे संतापलेले शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला होता. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील सातारा राडा प्रकरणी नाराजी बोलावून दाखवली होती. तसेच शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांकडून तुषार दोशी (Tushar Doshi) यांना निलंबन करण्याची मागणी केली होती. मात्र यानंतरही तुषार दोशी पोलीस अधिक्षक कार्यालयात दाखल झाले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर आता महत्वाची माहिती समोर आली आहे.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी (Tushar Doshi) यांना भोवले आहे. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कोण आहेत तुषार दोशी? (Who Is Tushar Doshi?)
तुषार दोशी हे महाराष्ट्र पोलीस दलातील एक वरिष्ठ IPS अधिकारी (पोलीस अधीक्षक) आहेत, जे सध्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान झालेल्या गदारोळामुळे आणि राजकीय संघर्षामुळे चर्चेत आहेत. त्यांच्यावर विधानपरिषदेत निलंबनाची घोषणा झाली होती. सुरुवातीला विधानपरिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी निलंबनाचे आदेश दिले होते, पण नंतर राम शिंदे यांच्या आदेशानंतर निलंबन रद्द होऊन ते पुन्हा पोलीस अधीक्षक सातारा कार्यालयात दाखल झाले होते. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी मंत्री शंभूराज देसाईंना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी पोलीस यंत्रणेने निष्क्रियता दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला यापूर्वी जालना येथील मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमार प्रकरणातही त्यांचे नाव चर्चेत आले होते.
सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी नेमकं काय घडलेलं? (Satara Zilla Parishad Election 2026)
- जि.परिषदेत शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे 65 पैकी 35 जागा मिळवत बहुमत
- भाजप 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर
- साताऱ्यात बहुमतासाठी 33 सदस्यांच्या पाठिंब्याची होती गरज
- अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने 6 सदस्य फोडत अध्यक्ष बनवला
- भाजपने शिवसेनेचे 2,राष्ट्रवादीचे 3 सदस्य फोडले
- भाजपने एका अपक्षाचाही पाठिंबा मिळवत अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली
- इतर दोन सदस्यांना पोलिसांनी मतदानापासून रोखल्याचा शिवसेनेचा आरोप
एकनाथ शिंदे काय म्हणाले होते? (Eknath Shinde On Satara ZP)
सातारा जिल्ह्यातील घटनेसंदर्भात माहिती शंभुराज देसाई आणि अर्जुन खोतकर यांनी मांडली. याचा मी साक्षीदार आहे. तिथे पाच ते दहा वर्षांपूर्वीचा गुन्हा दाखल केला. मी पोलीस अधीक्षकांना फोन केला की, त्यांना मतदानाच्या नंतर कारवाई करा. मतदानापासून वंचित ठेवता येत नाही. ते म्हणाले लगेच कारवाई करत नाही. मी पोलिस महासंचालकांना देखील फोन केला. मी तुषार दोषी यांच्याकडून खात्री केली होती. ते म्हणाले, मला फोन आला होता. मतदानापासून वंचित ठेवणे हा लोकशाहीचा खून करणे आहे. मंत्र्यांना देखील बघितले नाही. आरोपी प्रमाणे मंत्र्यांना घेऊन गेले.दोनच जणांना मतदानाला ते कसे घेऊन गेले? महाराष्टाराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती पाहिली, असे एकनाथ शिंदे म्हणाले होते.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते? (Devendra Fadnavis On Satara ZP)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी वस्तुस्थिती सांगितली आहे, त्याची चौकशी केली जाईल. त्यानुसार कारवाई केली जाईल, असे म्हणत त्यांनी एका वाक्यात विषय संपवला.
संबंधित बातमी:
आणखी वाचा







