शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्यात आणखी दोन मजल्याची पडणार भर; गौरी खानचा राज्य सरकारकडे अर्ज

0
17
शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्यात आणखी दोन मजल्याची पडणार भर; गौरी खानचा राज्य सरकारकडे अर्ज


बॉलिवूडचा किंग म्हणून अभिनेता खान शाहरुख ओळखला जातो. शाहरुख हा त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याचे राहते घर म्हणजे वांद्रे येथील ‘मन्नत’ बंगला हा मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरला आहे. हा बंगला २०१९.३८ चौरस मीटरमध्ये वसलेला आहे. पण आता शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान यांचा हा बंगला आणखी आलिशान बनवण्याकडे कल आहे. सहा मजली असलेली ही इमारत आणखी दोन मजल्यांनी वाढवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी गौरीने कोस्टल रोड ऑथेरिटीकडे अर्ज भरला आहे.



Source link