
Atishi will take oath today : दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी आज २१ सप्टेंबर रोजी शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा स्वीकारला आहे. तसेच ५ मंत्र्यांच्या नियुक्तीलाही मान्यता दिली. आज दिल्लीतील राज निवास येथे आतिशी यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. राष्ट्रपती कार्यालयाकडून यासंदर्भात अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर शनिवारी दुपारी किंवा संध्याकाळी शपथविधी सोहळा होईल.








