
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी इयत्ता नववीत शिकत होती. दरम्यान, तिने बुधवारी (२५ ऑक्टोबर) तिचा १५वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवशी तिने तिच्या मैत्रिणींना मिठाई घाऊ घातली. त्यानंतर घरी आल्यावर केक कापला. मात्र, ती गुरुवारी सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली. नातेवाईकांनी त्वरीत पोलिसांनी याबाबत माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.








