राजवीर आणि मयूरीचा लग्नसोहळा
या लग्नात मेहंदी, हळद, संगीत आणि लग्नसोहळा असे सगळे कार्यक्रम पार पडणार आहेत. या सोहळ्यात काही विशेष व्यक्तिरेखा सहभागी होणार आहेत. ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतील शिवानी सोनार ही अभिनेत्री धमाल असे नृत्य करणार आहे. याव्यतिरिक्त मयूरी आणि राजवीर, मयूरी आणि संपूर्ण सराफ कुटुंब एकत्र नृत्य करणार आहेत. रविवार रात्री ८ वाजता महाएपिसोड मध्ये लग्नं प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून त्या आधीच्या सगळ्या भागात संगीत, हळद असे कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत.








