
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा आज सुपरस्टार आहे. जगभरात त्याचे चाहते आहेत. पण एक काळ असा होता की सलमान खान रेखाचा दिवाना होता. सलमान खान लहानपणी रेखाचा शेजारी होता. रेखाने सांगितले आहे की, तिने सलमानला अनेकदा सायकलवरून पाठलाग करताना पाहिले आहे. विशेष म्हणजे कॅमिओ वगळता सलमान खानने रेखासोबत एकच चित्रपट केला आहे. त्याच्या कारकिर्दीतील हा पहिलाच चित्रपट होता. हा पहिला सिनेमा फ्लॉप व्हावा यासाठी सलमानने प्रार्थना केली होती. चला जाणून घेऊया सिनेमाविषयी…







