मोठी बातमी! निवडणूक आयोगाचा महाआघाडीला दिलासा; राज्यातील ‘या’ विधानसभा मतदारसंघात होणार फेर मतमोजणी

0
18
मोठी बातमी! निवडणूक आयोगाचा महाआघाडीला दिलासा; राज्यातील ‘या’ विधानसभा मतदारसंघात होणार फेर मतमोजणी


Maharashtra Assembly Election Results : महाराष्ट्रविधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान पार पडले व २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाला. या निकालात महायुतीची प्रचंड मोठी सुनामी आल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला व त्यांना ५० चा आकडाही गाठता आला नाही. त्यानंतर ईव्हीएमवर संशयाचे मोहोळ उठले आहे. विरोधकांनी ईव्हीएमविरोधात आवाज उठवण्यासाठी विरोधकांकडून पुन्हा वज्रमूठ करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली आहे. नाशिक पश्चिम मतदार संघात पुन्हा फेर मतमोजणी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी केली होती. त्यांची मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. त्यासंदर्भातील पत्र नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्याने सुधाकर बडगुजर यांना दिले आहे.



Source link