
‘आपल्या परंपरा विसरून मुघलांचं उदात्तीकरण करण्यात आलं असं काही लोक म्हणतात, त्यात काही प्रमाणात तथ्य आहे. पण म्हणून त्यांना खलनायक ठरवण्याची गरज नाही. ज्या लाल किल्ल्याला आपण पवित्र मानतो, तो मुघलांनीच बांधला होता. तरीही त्यांनी जे केलं ते वाईट आणि भयानकच होतं, तर मग ताजमहल, लाल किल्ला आणि कुतुबमिनार पाडून टाका, असंही त्यांनी सुनावलं. ताज: डिव्हाइडेड बाय ब्लड ही वेबसारिज ३ मार्चपासून प्रसारित होणार आहे.






