
मिळालेल्या माहितीनुसार, विजय बामानिया (वय, ३५), उस्मानी भंडारी (वय,२२) आणि विनोद गोयल (वय, ४५) हे तिघेजण शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास बोट घेऊन मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेले होते. मात्र, पाण्याचा वेग जास्त असल्याने समुद्रकिनाऱ्यापासून २-३ किमी अंतरावर त्यांची बोट उलटली. यानंतर तिघेही पाण्यात बुडाले. विजय बामानियाने कसाबसा पोहत समुद्रकिनारा गाठला. तर, उस्मानी आणि विनोद अजूनही बेपत्ता आहेत. अग्निशमन दल, जीवरक्षक दल आणि पोलीस यांच्याकडून या दोघांचा शोध घेतला जात आहे. त्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण धाले आहे. पोलिसांनी या दोघांना बेपत्ता घोषीत केलं आहे.






