मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर गँगरेप, चार जणांनी मारहाण करत केला अत्याचार

0
15
मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर गँगरेप, चार जणांनी मारहाण करत केला अत्याचार


बिहारमधील बेतिया जिल्ह्यात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम चंपारण जिल्ह्यातील मनुआपुल पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी मंगळवारी संध्याकाळी आपल्या मैत्रिणीसोबत फिरायला गेली होती. दोघेही एका निर्जन ठिकाणी बसले होते. त्यानंतर तेथे चार तरुण आले आणि त्यांनी आधी तरुणीच्या मित्राला बेदम मारहाण केली. त्यानंतर चौघांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार करत निर्घृण अत्याचार केले. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.



Source link