
विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटपाचा घोळ अद्याप मिटलेला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत २९ ऑक्टोबर रोजी संपत आहे, पण महाविकास आघाडी घटक – काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांमधील १० ते १२ जागा वाटपावरून मतभेद टोकाला पोहोचले आहे. दरम्यान, अखिलेश यादव यांची सपाही आपले उमेदवार स्वतंत्रपणे उभे करण्याच्या तयारीत दिसत आहे.







