
भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील आगामी टी-20 विश्वचषक (t20 world cup) उपांत्य फेरीच्या सामन्याचा उत्साह देशभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.
5 मार्च रोजी होणारा सामना लाईव्ह पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक वानखेडे स्टेडियमला भेट देण्याची अपेक्षा असताना आता हा सामना पाहण्यासाठी एक अधिक आरामदायी पर्याय उपलब्ध आहे.
मोठ्या सिल्व्हर स्क्रीनवर सामना पाहता येणार आहे. लांब रांगा आणि गर्दीच्या स्टँडशिवाय, तुमच्या आवडत्या पॉपकॉर्न आणि समोशाचा आनंद घेत तुम्हाला हा सामना पाहता येणार आहे.
मुंबईतील (mumbai) क्रिकेट चाहते वडाळा, नरिमन पॉइंट, नालासोपारा, वाशी आणि इतर अनेक थिएटरमध्ये (theaters) मोठ्या स्क्रीनवर भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य सामना हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत पाहू शकतात.
हिंदी स्क्रीनिंग्ज:
मेट्रो आयनॉक्स सिनेमा, एमजी रोड
मिराज सिनेमा: आयमॅक्स, वडाळा
पीव्हीआर ओडियन, घाटकोपर
पीव्हीआर सी अँड बी स्क्वेअर, चकाला
पीव्हीआर मार्केट सिटी, कुर्ला
पीव्हीआर सिटी मॉल, अंधेरी
मिरज सिनेमा : अनुपम मॉल, गोरेगाव
आयनॉक्स रघुलीला मॉल, वाशी
पीव्हीआर इन्फिनिटी, मालाड
पीव्हीआर मिलाप, कांदिवली
आयनॉक्स पाम बीच गॅलरी, वाशी
मिराज सिनेमा: आर मॉल, मुलुंड
देवगण सिनेक्स, मुलुंड
Maison PVR, Jio World Drive, BKC
पीव्हीआर ओरियन मॉल, पनवेल
INOX रघुलीला मेगा मॉल, कांदिवली
पीव्हीआर लोढा एक्सपेरिया, पलावा
आयनॉक्स ठाकूर मॉल, दहिसर
पीव्हीआर कॅपिटल मॉल, नालासोपारा
मिरज सिनेमा, नालासोपारा
इंग्रजी स्क्रीनिंग्ज:
आयनॉक्स लेसरप्लेक्स सीआर२, नरिमन पॉइंट
पीव्हीआर आयकॉन, फिनिक्स पॅलेडियम, लोअर परळ
आयनॉक्स इन्सिग्निया, अॅट्रिया मॉल
आयनॉक्स आर सिटी, घाटकोपर
पीव्हीआर डायनामिक्स, जुहू
एचडीएफसी मिलेनिया पीव्हीआर आयकॉन, ओबेरॉय मॉल, गोरेगाव
पीव्हीआर आयकॉन, अंधेरी
INOX मेगाप्लेक्स, इनॉर्बिट मॉल, मालाड
आयनॉक्स कोरम मॉल, ठाणे
या सामन्याच्या प्रक्षेपणाची सुरूवात संध्याकाळी 6:00 ते 6:40 दरम्यान आहे. तसेच या सामन्याच्या तिकिटांची किंमत 170 ते 1500 रुपयांपर्यंत आहे.
हेही वाचा






