
वरिष्ठ संचालक, निवासी सेवा आणि विकासक उपक्रमचे अध्यक्ष रितेश मेहता यांच्या मते, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी प्रीमियम सी-फेसिंग अपार्टमेंट्स पसंत करतात जे त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी विक्रीसाठी सहज उपलब्ध नसतात. त्यामुळे ते भाड्याने राहणे पसंत करतात. “ते प्रथम फ्लॅट भाडेतत्त्वावर घेण्यास प्राधान्य देतात. परंतुसोबतच त्यांना हव्या असलेल्या घराचा शोध देखील घेत असतात. एकदा त्यांना त्यांच्या आवडीचे अपार्टमेंट सापडले की ते शेवटी ते विकत घेतात. अशी काही प्रकरणे देखील घडली आहेत ज्यामध्ये नव्या कलाकारांनी पहिले भाड्याने घर घेण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला अपार्टमेंट परवडत नाही. याशिवाय, त्यांची कमाई नियमित नसते आणि ते नियमित मोठ्या रक्कमेचा ईएमआय भरु शकत नाहीत. असे देखील काही कलाकार आहेत जे केवळ भाड्याने मिळणाऱ्या उत्पन्नासाठी अपार्टमेंट विकत घेतात,” असे ते पुढे म्हणाले.






