बॉलिवूड कलाकारांवरही भारी पडली मराठमोळी छाय कदम, ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये झाले ‘या’ सिनेमाचे स्क्रिनिंग

0
16
बॉलिवूड कलाकारांवरही भारी पडली मराठमोळी छाय कदम, ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये झाले ‘या’ सिनेमाचे स्क्रिनिंग


गेल्या काही दिवसांपासून 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी या फेस्टिव्हलला हजेरी लावली. पण या सगळ्यात मराठमोळी अभिनेत्री छाया कदमने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पायल कपाडियाच्या ऑल वी इमॅजिन एज लाईट या चित्रपटातील भूमिकेसाठी छाया कदमचे खूप कौतुक होत आहे. प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जेव्हा तिला स्टँडिंग ओव्हेशन मिळाली तेव्हा अभिनेत्री भावूक झाली होती. छायाने यापूर्वी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत, ज्यातून एक कलाकार म्हणून तिची अष्टपैलू प्रतिमा निर्माण झाली आहे.  आता कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये छायाचे कोणते चित्रपट दाखवण्यात आले चला पाहूया…



Source link