बुलेट ट्रेन फक्त जगाला दाखवण्यासाठी, त्यासाठी महाराष्ट्र सरकारनं कर्ज काढण्याचं कारण काय?; रोहित पवारांचा सवाल

0
14
बुलेट ट्रेन फक्त जगाला दाखवण्यासाठी, त्यासाठी महाराष्ट्र सरकारनं कर्ज काढण्याचं कारण काय?; रोहित पवारांचा सवाल


महाराष्ट्राच्या बाबतीत बुलेट ट्रेनच्या उपयुक्ततेवर व व्यवहार्यतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ‘प्रस्तावित बुलेट ट्रेन महाराष्ट्रात १५० किमी अंतर कापणार आहे, तर गुजरातमध्ये ३८४ किमी अंतर कापणार आहे. बुलेट ट्रेनच्या १२ स्थानकांपैकी महाराष्ट्रात फक्त ४ स्टेशन येतात, गुजरातमध्ये ८ स्टेशन आहेत. त्यासाठी १ लाख १० हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. मात्र, त्याची जबाबदारी केंद्र सरकारनं घ्यायला हवी. महाराष्ट्र सरकारनं कर्ज घ्यायचं कारण काय? विमान उपलब्ध असताना बुलेट ट्रेनची गरज काय?,’ असा सवालही रोहित पवार यांनी केला.



Source link