
व्हायरल क्लिपमध्ये दिसते की, एक पिता दारूच्या दुकानासमोरच मुलाला चप्पलेने मारत आहे. मुलाच्या हातात बिअरची बाटली असून तो म्हणत आहे की, पापा हे माझे नाही, मी बिअर पीत नाही. मात्र वडील त्याचे काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत व त्याला चप्पलेने मारत असतात. त्यानंतर मुलगा म्हणतो की, पापा ही बाटली माझी नाही शपथ, मित्रांनी मागवली होती. मला का मारत आहात.. सर्वजण पाहात आहेत, मी पीत नाही.







