बाबासाहेबांवरील वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांनीही भाजपला घेरलं, ‘त्यांची जुनी मानसिकता समोर आली…’

0
62
बाबासाहेबांवरील वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांनीही भाजपला घेरलं, ‘त्यांची जुनी मानसिकता समोर आली…’


Prakash Ambedkar On Amit Shah : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावरून खळबळ उडाली आहे. काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे. तर संसदेत देखील मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही अमित शहा यांच्या विधानवरून त्यांचा समाचार घेतला आहे. यांची जुनी मानसिकता समोर आली आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. भाजप अस्तित्वात येण्यापूर्वीच जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बाबासाहेबांना विरोध केला होता. राज्यघटना स्वीकारली जात असताना हा विरोध करण्यात आला होता.



Source link