
मुंबई गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भोस्ते घाटाच्या जंगलात बुधवारी मानवी कवटी तसेच कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या घाटात पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह शेकडो किमी लांब असलेल्या तरुणाच्या स्वप्नात जात होता. मृत व्यक्ती स्वप्नामध्ये जाऊन तरुणाकडे मदतीसाठी याचना करत होती. दररोज स्वप्न पडत असल्याने तरुणाने खेड पोलीस ठाणे गाठले व सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर समोरचे दृष्य पाहून त्यांना धक्काच बसला. तरुणाला पडलेल्या स्वप्नातल्या गोष्टी खऱ्या ठरल्या होत्या. भोस्ते घाटामध्ये निर्जन ठिकाणी पोलिसांना कुजलेला मृतदेह सापडला.




