
Flipkart Delivery Boy Misbehaviour: सोशल मीडिया हे एखाद्या शस्त्रापेक्षा कमी नाही. अनेकजण त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतात. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत एका तरुणीने सोशल मीडियावर फ्लिपकार्टबाबत संताप व्यक्त केला आहे. फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉयने त्यांच्यासोबत चांगली गैरवर्तणूक केल्याचे तिने ट्विटरद्वारे म्हटले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कंपनीने संबंधित डिलिव्हरी बॉयविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे अश्वासन दिले. या तरुणीची तक्रार सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.








