फलटणमध्ये महात्मा फुले जयंतीनिमित्त नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व अल्पोपहाराची व्यवस्था

0
4
फलटणमध्ये महात्मा फुले जयंतीनिमित्त नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व अल्पोपहाराची व्यवस्था

फलटणमध्ये महात्मा फुले जयंतीनिमित्त नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व अल्पोपहाराची व्यवस्था

फलटण (प्रतिनिधी) — क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त फलटण येथील महात्मा फुले चौकात अभिवादनासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली. या पार्श्वभूमीवर तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समिती आणि साहस क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी पिण्याचे पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
या उपक्रमामुळे अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर थंड पाणी व अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करून देत आयोजकांनी सामाजिक बांधिलकी जपली. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमादरम्यान महात्मा फुले यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन अशा उपक्रमांतून समाजसेवेचा आदर्श घालावा, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीचे पदाधिकारी व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.