
नवी मुंबई – एआयईएसईसीच्या वतीने नेक्सस सीवूड्स मॉलमध्ये ‘ग्लोबल व्हिलेज’चे आयोजन करण्यात आले आहे. १६ ते १७ डिसेंबर रोजी मॉलमधल्या दुसऱ्या मजल्यावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय हा कार्यक्रम सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहील. कार्यक्रमामध्ये जगभरातील वैविध्यपूर्ण परंपरेचा अनुभव घेता येणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असणार आहे.




