
आपल्या दमदार अभिनयासोबतच आपल्या अनोख्या डान्स स्टेप्सनी प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणारे डिस्को डान्सर, ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा आज (१६ जून) वाढदिवस आहे. आज अभिनेते मिथुन चक्रवर्ती आपला ७४वा वाढदिवस साजरा करत आहेत. मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म १६ जून १९५० रोजी झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या करिअरमध्ये आतापर्यंत ३५०हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये हिंदी व्यतिरिक्त पंजाबी, तामिळ, तेलुगू, भोजपुरी अशा विविध भाषांमधील चित्रपटांचा समावेश आहे. आपल्या दमदार कारकिर्दीव्यतिरिक्त, मिथुन चक्रवर्ती त्यांच्या प्रेमकहाणीमुळे देखील चर्चेत होते.








