
धाराशिव : धाराशिव शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर (Jyoti Kranti Multistate Bank) सशस्त्र दरोडा टाकून लाखोंच्या सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे. चोरलेल्या मुद्देमालाची किंमत २ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी पाच वाजण्याच्या सुमारास हा दरोडा पडला. बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून दरोडा घातल्याचा प्रकार समोर येताच शहरात खळबळ माजली आहे.



