देवेंद्र पावले नाहीतर जेलमध्ये गेला असता, आता तरी सुधरा, जयकुमार गोरेंचा रामराजेंवर हल्लाबोल

0
28


Jayakumar Gore on Ramraje Naik Nimbalkar :  गेल्या काही दिवसांपासून मंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) हे रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्यावर जोरदार टीका करत असल्याचे दिसून येत आहे. आजही फलटणमध्यो बोलताना गोरेंनी रामराजेंवर हल्लाबोल केला. 
देवेंद्र पावले नाहीतर जेलमध्ये गेला असता. आता तरी सुधरा, नीट वागा असे म्हणज जयकुमार गोरे यांनी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जहरी टीका केली.  

फलटण येथील मेळाव्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जहरी टीका केली आहे. “असत्य, कटकारस्थानाचा आनंद तात्पुरता असतो. शकुनी मामांनी कटकारस्थानातून दुर्योधनाच्या अंताचा आसुरी आनंद घेतला. तशाच प्रकारचा असुरी आनंद जयकुमार गोरे, रणजितसिंह तसेच गाळेधारकांवर अन्याय करत असताना ते आसुरी आनंद घेत होते. मात्र त्यांनी रचलेला डाव आता त्यांच्यावरच उलटला आहे. स्वतःला वाचवण्यासाठी कोणा-कोणाचे पाय धरलेत हे मला माहित असल्याचे जयकुमार गोरे म्हणाले. 

मी माफ केलं म्हणून जेलमध्ये बसायचं वाचलात 

परमेश्वराच्या रुपाने आपणाला देवेंद्र पावले. मी माफ केलं म्हणून जेलमध्ये बसायचं वाचलात असेही जयकुमार गोरे म्हणाले. त्याची जाणीव ठेवा. आता तरी सुधरा, नीट वागा. चुकीचं वागलात तर ते तुम्हालाच फेडावे लागणार आहे हे ही ध्यानात ठेवा अशी टीका जयकुमार गोरे यांनी रामराजेंवर केली.

कटकारस्थान जास्त दिवस टिकत नाहीत

कटकारस्थान जास्त दिवस टिकत नाहीत. हा आनंद जास्त दिवस नसतो, तात्काळ असतो असे जयकुमार गोरे म्हणाले. माझ्यावर 29 केसेस झाल्या तरी मान कधी वाकवली नाही. कोणाच्या दारात कधी गेला नाही असे गोरे म्हणाले. रामराजे नाईक निंबाशकर यांनी रचलेला डाव आता त्यांच्यावरच उलटला आहे. स्वतःला वाचवण्यासाठी कोणा-कोणाचे पाय धरलेत हे मला माहित असल्याचे जयकुमार गोरे म्हणाले. तुमच्या दारासमोर पोलीस उभा राहिल्याचे देखील गोरे म्हणाले. जयकुमार गोरे हे फलटणमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जहरी टीका केली आहे. देवेंद्र पावले नाहीतर जेलमध्ये गेला असता. आता तरी सुधरा अशी टीका त्यांनी केली आहे. दरम्यान, आता जयकुमार गोरे यांच्या या टीकेला रामराजे नाईक निंबाळकर काही उत्तर देणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

तुमच्यात दम असेल तर मैदानात या, नाव न घेता जयकुमार गोरेंचा रामराजे नाईक निंबाळकरांवर हल्लाबोल 

 

आणखी वाचा



Source link