
Sanjay Raut on Eknath Shinde : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आज देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे हे नाराज असल्याने ते आज शपथ घेणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, यावर खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांच्यात दिल्लीशी पंगा घेण्याची हिम्मत नाही. त्यामुळे ते आज १०० टक्के शपथ घेतली असे राऊत म्हणाले. उपमुख्यमंत्री पद हे अजित पवार यांच्यासाठी आरक्षित केलं आहे, असा टोला देखील राऊत यांनी लगावला आहे.





