
‘सैराट’ चित्रपटाचे बजेट ४ कोटी रुपये होते. पण चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा तो तुफान हिट ठरला. चित्रपटाने जवळपास १०० कोटी पेक्षा जास्त कमाई केली. तसेच रिंकू आणि आकाशला रातोरात स्टार बनवले. आकाश तर एका सामान्य कॉलेजमध्ये जाणार, पैलवानीच प्रशिक्षण घेणारा सोलापूरमधला मुलगा रातोरात स्टार बनला. या चित्रपटानंतर आकाशने काही हिंदी वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये काम केले.







