
दिग्दर्शकाने फेटाळले आरोप
चित्रपट निर्माते रणजित यांनी बंगाली अभिनेत्री श्रीलेखाचे सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, ‘ती एकटी त्या फ्लॅटमध्ये नव्हती. त्या फ्लॅटमध्ये तिच्यासोबत दोन सहाय्यक दिग्दर्शक आणि पटकथालेख शंकर रामकृष्णन देखील होते. त्यांच्या उपस्थितीत मी श्रीलेखाला भेटलो. शंकरने श्रीलेखाला चित्रपटाची कथा सांगितली, त्यानंतर ती खूप एक्साइटेड झाली. पण तिला कोणती भूमिका द्यायची याबाबत सर्वजण संभ्रमात होते. नंतर तिला नकार देण्यात आला आणि शंकरला ही गोष्ट श्रीलेखाला सांगण्यास सांगण्यात आले. यामुळे श्रीलेखा प्रचंड संतापली होती.’







