तुळजाभवानीच्या दागिन्यांसह चांदीचा मुकुटही गहाळ, महंत फरार

0
14
तुळजाभवानीच्या दागिन्यांसह चांदीचा मुकुटही गहाळ, महंत फरार


महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह चांदीचा मुकूटही गहाळ झाला आहे. मंदिराच्या खजिन्यातून ६३ भार वजन असलेला चांदीचा मुकूट गहाळ झाल्याचे  समोर आल्याने खळबळ माजली आहे. मंदिर संस्थान कडून याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत २०११ सालापूर्वी चांदीचा मुकुट मंदिरातून गायब झाला असल्याचा संशय व्यक्त केली आहे. हा चांदीचा मुकुट महंत चिलोजीबुवा यांच्या ताब्यात होता. आता महंत चिलोजीबुवाही फरार झाले असून पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.



Source link