
अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने साताऱ्याचा विकास, मराठा आरक्षण यासह देशपातळीवरील प्रश्नांचाही आपल्या छोटेखानी भाषणात आढावा घेतला. देशावरील कर्ज, महागाई, भ्रष्टाचार याकडे तिने लक्ष वेधले. महिला खेळाडूंच्या बाबतीत जे राजकारण झाले, ते मनाला वेदना देणारे होतं, अशा भावना तिने व्यक्त केल्या. अश्विनीच्या भाषणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रचंड प्रतिसाद दिला. अश्विनी महांगडे हि केवळ अभिनेत्री म्हणून नाही तर, एका सामाजिक कार्यकर्ती म्हणून देखील चर्चेत असते. अश्विनी महांगडे हिने तिच्या ‘रयतेच स्वराज्य’ या संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले आहेत. आजवर तिने अनेक संघर्ष करून इथवरचा टप्पा गाठला आहे. साताऱ्याच्या वाईमधून सुरू झालेला तिचा हा प्रवास आता मनोरंजन विश्व ते निवडणुकीच्या रणमैदानापर्यंत यशस्वीपणे पोहोचला आहे.







