जे माझ्या मनाला भावतं ते माझ्या गळ्यातून उतरतं; ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

0
23
जे माझ्या मनाला भावतं ते माझ्या गळ्यातून उतरतं; ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित


स्वरगंधर्व सुधीर फडके हे मराठी घराघरांत आणि मनामनात पोहोचलेले एक अजरामर नाव. मराठीसोबतच हिंदी गायक, संगीतकार म्हणून त्यांनी संगीतप्रेमींच्या मनात एक ठसा उमटवला. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायकीने आणि संगीताने श्रोत्यांना तृप्त केले. ‘गीतरामायणा’तील गोडव्याने, भावविभोर गीतांनी ‘बाबुजीं’नी मराठी मनावर अधिराज्य केले. अशा या रसिकमनाचा ठाव घेणाऱ्या ‘बाबुजीं’ची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.



Source link