
Chhagan Bhujbal : महायुती सरकारमध्ये मंत्रिपद डावलल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ नाराज आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात सहभागी न होता त्यांनी थेट नाशिक गाठले. या सोबतच पुढील अधिवेशनात सहभागी होणार नसल्याचं देखील छगन भुजबळ यांनी जाहीर केले. छगन भुजबळांच्या या नाराजीनंतर आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. पक्षातील नाराजी नाट्यवरून अजित पवार देखील दोन दिवस नॉट रीचेबल होते. दरम्यान, भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार तीन मोठ्या नेत्यांना नाशिकला पाठवणार असल्याची माहिती आहे.





