
गेमिंग झोनमध्ये आग कशामुळे लागली याचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात दिसते की, पहिल्या मजल्यावर एका ठिकाणी वेल्डिंगचे काम सुरू होते. त्याच्या खाली फोम शीट, प्लास्टिकचे साहित्य आणि मोठ्या प्रमाणात थर्माकोलच्या शीट व इतर साहित्य ठेवले होते. त्यावर वेल्डिंगच्या ठिणग्या पडल्या आणि आग लागली. कर्मचाऱ्यांना आग विझविण्यात अपयश आले. अवघ्या दोन-तीन मिनिटांमध्येच आगीने रौद्ररुप धारण केले व संपूर्ण गेम झोन आपल्या कवेत घेतले.








