अंदाज अपना अपना
१९९४साली प्रदर्शित झालेला ‘अंदाज अपना अपना’ हा चित्रपट अशा निवडक बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे, जो तुम्ही कितीही वेळा पाहिला तरी तुम्हाला कंटाळा येणार नाही. या चित्रपटात आमिर खान, सलमान खान, करिश्मा कपूर, रवीना टंडन, शक्ती कपूर आणि परेश रावल यांच्या दमदार भूमिका आणि उत्कृष्ट अभिनय पाहायला मिळाला आहे.






