
khalistani attack hindu temple in US : कॅनडानंतर आता अमेरिकेत हिंदू मंदिरावर खलिस्तानवाद्यांनी हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. अमेरिकेतील नेवार्क, कॅलिफोर्निया येथील हिंदू मंदिरावर हा हल्ला करण्यात आला असून मंदिराच्या भिंतींवर भारतविरोधी आणि खलिस्तान समर्थक घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने ट्विटरवर या संबंधी काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामध्ये स्वामीनारायण मंदिर वसना संस्थेच्या भिंतींवर भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात द्वेषपूर्ण घोषणा लिहिलेल्या दिसत आहेत.








