आता काय माती खायची का? पंतप्रधान कोण हवा विचारताच बावनकुळेंवर संतापली महिला, व्हिडिओ व्हायरल

0
28
आता काय माती खायची का? पंतप्रधान कोण हवा विचारताच बावनकुळेंवर संतापली महिला, व्हिडिओ व्हायरल


बावनकुळे पुढे गेल्यानंतर संतप्त झालेल्या महिलेला तेथील एकाने विचारले काय झालं व तुम्हाला काय पाहिजे. यावर सरकार विजेचे बिल वाढवून देतं, सिलिंडर वाढवून देतं, आम्हाला काम धंदे नाही, माती खायची का? असा संतप्त सवाल महिलेने केला. महिलेचा संतप्त अवतार पाहून  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तेथून काढता पाय घेतला व तरीही महिला शांत होत नसल्याचे पाहून तुम्ही स्टेजवर चला, आपण स्टेजवर बोलू अशी विनंती केली. यावर संतापलेल्या महिलेने स्टेजवर बोलायचे तर मग लोकांना रस्त्यावर विचारता कशाला? असा प्रतिप्रश्न केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.



Source link