
Uttar Pradesh Rape survivor Murder: उत्तर प्रदेशच्या कौशांबी येथील एका गावात बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली. बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि त्याच्या भावाने पीडिताची कुऱ्हाडीने हत्या केली, असा आरोप मृताच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेपूर्वी आरोपी पीडितावर बलात्कार केल्याप्रकरणी तुरुंगात गेला होता. मात्र, जामीनावर सुटून आल्यानंतर आरोपी हा तक्रार मागे घेण्यासाठी पीडिताच्या कुटुंबावर सतत दबाव टाकत होता. परिवाराला जीवे मारण्याच्या धमक्या देण्याबरोबरच त्यांना मारहाण देखील करण्यात आली.याबाबत पीडित पक्ष सातत्याने पोलिसांकडे तक्रार करत असल्याचे बोलले जात आहे.








