अरमान मलिक अडकला लग्न बंधनात! सोशल मीडियावर पत्नीचा सुंदर फोटो शेअर करत म्हणाला…

0
19
अरमान मलिक अडकला लग्न बंधनात! सोशल मीडियावर पत्नीचा सुंदर फोटो शेअर करत म्हणाला…


Armaan Malik-Aashana Shroff Marriage : बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांसाठी दमदार गाणी गाणारा गायक अरमान मलिक आपल्या गर्लफ्रेंडसोबत विवाहबंधनात अडकला आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अरमान मलिक आणि त्याची पत्नी आशना श्रॉफ खूप खुश दिसत आहेत. अरमान मलिक आणि त्याची पत्नी आशना मलिक यांच्या या फोटोंवर कमेंट करत त्यांचे चाहते आणि मित्रांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. या फोटोंमध्ये अरमान आनंदाने ओरडताना दिसत आहे.



Source link