
अमृतसरमधील सुवर्ण मंदिर परिसरात एका २५ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुद्वारा बाबा अटल राय इमारतीच्या सातव्या मजल्यावरून मुलीने उडी मारली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सुवर्ण मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली. घाईघाईत पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही महिला एकटीच सुवर्ण मंदिरात पोहोचली होती आणि तिची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुलीच्या आत्महत्येचे कारणही शोधले जात आहे.







