- Marathi News
- Opinion
- Pakistan’s Fragmentation Is Increasing Suspicion Of Disintegration, Sindhi, Pakhtun And Baloch Separatism
4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
१९७१ मध्ये एकदा पाकिस्तानची फाळणी झाली. ५०वर्षांनंतर दुसऱ्यांदा फाळणी होण्याची शक्यता नाकारतायेत नाही. या वेळी पाकिस्तान फुटला तर त्याचे अनेकतुकडे होतील. या प्रकरणातील पहिला प्रश्न असा आहेकी, मागील फाळणीच्या मॉडेलची पुनरावृत्ती करता येईलका?
मागील मॉडेलमध्ये तीन विशेष गोष्टी होत्या. भारताच्यालष्करी हस्तक्षेपाने निर्णायक भूमिका बजावली. ७० च्यादशकातील शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत युनियननेभारताला दिलेल्या पाठिंब्यामुळे अमेरिकेची पाकिस्तानसमर्थक भूमिका निष्प्रभ झाली. त्या वेळी पाकिस्तानआधीच अतिशय अनैसर्गिक पद्धतीने दोन दूरच्याभौगोलिक भागांत विभागलेला होता. पाकिस्तानच्या फाळणीचे आणखी एक संभाव्य मॉडेल आहे, ते त्याच्या अंतर्गत राजकारणातील विकृतींमुळे होणाऱ्या संभाव्य स्फोटाशी जोडलेले आहे. या अंतर्गत स्फोटांची भीती पहिल्यांदा २०२२ मध्ये प्रकर्षाने समोर आली, तेव्हा पाकिस्तानच्या एका वरिष्ठ नेत्याने उघडपणे पाकिस्तानफुटला तर तो कसा आणि का फुटेल याचे तपशीलवार स्पष्टीकरण दिले. हे विधान इम्रान खान यांनी केले होते, ते पंतप्रधान होते आणि पाकिस्तानला विघटनाच्याधोक्यापासून वाचवण्यासाठी मुक्त व निःपक्ष निवडणुकाघेण्याची मागणी करत होते.
इम्रान म्हणाले होते : “संस्था योग्य निर्णय घेत नसतील तरत्याही नष्ट होतील. आपण चूक केली तर फटका बसणारीसर्वात मोठी संस्था कोणती असेल? पाकिस्तानी सैन्य.सैन्याला फटका बसल्यावर आपल्याकडून कोणतीसवलत घेतली जाईल? युक्रेनकडून अण्वस्त्रनिःशस्त्रीकरणासाठी घेतलेली सवलत. सर्वात मोठा मुद्दाअसा आहे की, आपला एकमेव मुस्लिम देश आहे,ज्याकडे अण्वस्त्र प्रतिबंधक क्षमता आहे. ती गेली तर कायहोईल? पाकिस्तानचे तीन भाग होतील.”
येथे इम्रान वेगळ्या सिंध राष्ट्र, पख्तून राष्ट्र आणिबलुच राष्ट्राकडे बोट दाखवताना दिसतात. फक्तपंजाबसह पाकिस्तान राहील. ज्या वेळी हे विधानकरण्यात आले, त्या वेळी सिंधमध्ये वारंवार कर्फ्यूलावला जात होता. खैबर पख्तुनख्वाचे नेतेइस्लामाबादविरुद्ध त्यांच्या प्रादेशिक सैन्याचा वापरकरण्याची धमकी देत होते. बलुचिस्तानमध्ये सशस्त्रबंडखोर सैन्यावर हल्ला करत होते.
आज इम्रान तुरुंगात आहेत. त्यांचा पक्ष राजकीयदृष्ट्याजवळजवळ निष्क्रिय झाला आहे. शाहबाज शरीफलष्कराच्या प्याद्यासारखे राज्य करत आहेत. अमेरिकेला हेमाहीत आहे, म्हणूनच परराष्ट्रमंत्री मार्को रुबियोभारताकडून युद्धबंदी मिळवण्यासाठी शरीफ यांच्याआधीजनरल असीम मुनीर यांच्याशी बोलले. अमेरिकेनेआयएमएफकडून २.२५ अब्जची डाॅलरची व्यवस्था केलीनसती तर इम्राननी ज्या डिफॉल्ट परिस्थितीचा उल्लेखकेला होता तीच परिस्थिती उद्भवली असती.
पाकिस्तानचे विभाजन होण्यापासून तीन शक्ती रोखतआहेत : त्याचे सैन्य, अमेरिका आणि चीन. लष्कराने खरीराजकीय प्रक्रिया स्थगित केली आहे आणि पूर्णपणेबनावट राजकीय प्रक्रिया लादली आहे. इम्रान नक्कीचतुरुंगात आहे, पण ते पाकिस्तानचा सर्वात लोकप्रिय नेतेआहेत. आज निवडणुका प्रामाणिकपणे झाल्या तर त्यांनाएकतर्फी विजय मिळेल. अमेरिका कसा तरीपाकिस्तानची ढासळत चाललेली अर्थव्यवस्था टिकवूनठेवत आहे. पाकिस्तानवर प्रचंड परकीय कर्ज आहे,त्यापैकी एकपंचमांश कर्ज चीनचे आहे. जगातील सर्वातमोठी शक्ती अमेरिका व त्याच्या बरोबरीचा होऊ पाहणाराचीन, दोघांनाही पाकिस्तानचे चार तुकडे करून तो नष्टहोऊ नये, असे वाटते. दक्षिण आशियातील भारताचा उदयरोखण्यासाठी पाकिस्तानने भारताचा पाय खेचण्यासाठीराहावे, अशी त्यांची इच्छा आहे.
पाकिस्तानला कायमचे टिकायचे असेल तर तिथे राजकीयप्रक्रिया पूर्ववत करावी लागेल. निवडून आलेल्यालोकप्रिय सरकारला बलुच, सिंध आणि पख्तूनउपराष्ट्रीयत्वाच्या प्रतिनिधींना वाटाघाटीच्या टेबलावरआणावे लागेल. त्यांना सांस्कृतिक व राजकीय स्वायत्ततादिली पाहिजे. १९४७ च्या फाळणीनंतर भारताने नागालँड,मिझोराम, पंजाब, काश्मीर व सुरुवातीला तामिळनाडूतविविध रणनीती वापरून फुटीरतावादी राजकारण निष्प्रभकेले आणि राष्ट्रीय एकात्मतेचे रक्षण केले. पाकिस्तानीलोकांची इच्छा असेल तर ते या बाबतीत भारताकडूनशिकू शकतात.
पाकिस्तानला कायमचे टिकून राहायचेअसेल तर त्याला देशात राजकीयप्रक्रियापूर्ववत करावी लागेल. निवडून आलेल्यालोकप्रिय सरकारलाबलुच, सिंध वपख्तून उपराष्ट्रीयत्वाच्या प्रतिनिधींनावाटाघाटीच्या टेबलावरआणावे लागेल.




